नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे. रामनाथ कोविंद यांना एनडीएतील घटकपक्षापैकी शिवसेना वगळता सर्वांचा पाठिंबा आहेच. त्याचबरोबर दक्षिणतील राज्यांनी कोविंद यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात तेलंगाचे सत्ताधारी टीआरएस आंध्रप्रदेशातला प्रमुख पक्ष असणारा जगन रेड्डींचा वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी एनडीएला आपला उमेदवार निवडणूक आणण्यासाठी आवश्यक असणारी 51 टक्के मतं जुळवावी लागणार होती. काल अमित शाहांनी कोविंद यांची उमेदवारी जाहिर केल्यावर चित्र एकदम पालटलं. आताच्या स्थितीतही कोविंद यांचा विजय निश्चित करणारी आहेच. पण ही स्थिती आणखी मजबूत होण्याची चिन्हं आहेत. 


कोविंद यांच्या बाजूनं मुलायम सिंहांचा समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष उभा राहण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये आणखी साधारण साडे तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.


पाहा व्हिडिओ