कावेबाज चीनच्या पुन्हा नव्या उचापती, सीमेवर नव्या बांधकामाला सुरुवात
भारत चीन सीमा रेषेवर गेल्या दीड वर्षापासून तणाव आहे. वारंवार चीनच्या कुरापती सुरूच आहेत
लडाख: भारत चीन सीमा रेषेवर गेल्या दीड वर्षापासून तणाव आहे. वारंवार चीनच्या कुरापती सुरूच आहेत. मागच्या एक वर्षापासून चीनने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता चीनने सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे.
मागच्या एक वर्षापासून चीनने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता चीनने सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलजवळील सिक्कीम, पूर्व लडाखमध्ये हे स्थायी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चिनी सैनिक भारताच्या सीमेजवळ ठाण मांडून बसण्यासाठी तयारी करत असल्याचे यातून दिसत आहे.
उत्तर सिक्कीमच्या नकुल भागापासून काही किलोमीटर अंतरावर हे बांधकाम सुरू कऱण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या भागातच भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. गेल्या काही दिवसांत चीन सीमेवर पुन्हा आपली ताकद वाढवत असल्याचे दिसत आहे.
चिनी सैनिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे तसेच आवश्यकता असल्यास चाल करण्यासाठी हे बांधकाम केले जात आहे. या प्रकारची बांधकामे लडाखसह अरुणाचल प्रदेशातील भारताच्या सीमेजवळ बनवली गेल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासोबत सीमेवर पोहोचण्यासाठी हायटेक रस्त्यांची निर्मितीही करण्यात आली आहे.
चिनचा हा सगळा खटाटोप वेळ आली तर हल्ला करण्यासाठी सोपं जावं यासाठी आहे. पण भारतील लष्कर या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेऊन आहे. आणि वेळ आलीच तर चिनी सैन्याला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहे.