Independence Day 2022: भारताव्यतिरिक्त, हे 5 देश देखील 15 ऑगस्ट रोजी करतात स्वातंत्र्य दिन साजरा
जाणून घेऊया भारताप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या पाच देशांबद्दल...
Independence Day 2022: भारताचा स्वातंत्र्य दिन अगदी काही दिवसांवर ठेपला आहे. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने देशवासियांना हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे.
15 ऑगस्टला आपण ब्रिटिशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण करणार आहोत. या वर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. पण भारताशिवाय इतरही देश १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. आपल्याप्रमाणे हे देशही हा खास दिवस साजरा करतात.
त्यामुळे जाणून घेऊया भारताप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या पाच देशांबद्दल...
1. दक्षिण कोरिया
भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरियाही या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यापूर्वी हा देश जपानच्या ताब्यात होता, मात्र १५ ऑगस्ट १९४५ रोजी हा देश स्वतंत्र झाला.
2. उत्तर कोरिया
उत्तर कोरियाही १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. हा देशही पूर्वी जपानच्या ताब्यात होता. दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्यानंतर उत्तर कोरियाही स्वतंत्र झाले.
3. बहरीन
बहरीन १५ ऑगस्ट १९७१ रोजी स्वतंत्र झाले. बहारीनवर ब्रिटनचा ताबा होता. या दिवशी बहरीनचा शासक इसा बिन सलमान अल खलिफा याची बहरीनच्या प्रमुख पदाची निवड झाली.
4. कांगो
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोने 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रेंच राज्यकर्त्यांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले. हा देश मध्य आफ्रिकन प्रदेशात येतो. हे 1880 मध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांनी गुलाम बनवले होते. प्रथम हा देश फ्रेंच कांगो म्हणून ओळखला जात होता. नंतर 1903 मध्ये मध्य कांगो म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यानंतर, फुलबर्ट यूलू हे देशाचे पहिले राष्ट्रपती झाले आणि त्यांनी 1963 पर्यंत या पदी कायम होते.
5. लिकटेंस्टाईन
जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या लिकटेंस्टीनला 1866 मध्ये जर्मन राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळाले. मात्र 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिन 1940 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असते. 5 ऑगस्ट 1940 रोजी, लिकटेंस्टीनच्या प्रिन्सिपॅलिटीच्या सरकारने अधिकृतपणे 15 ऑगस्ट हा देशाचा राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला.