Independence Day 2022: लाल किल्ल्यावरून धडाडल्या स्वदेशी तोफा; Video पाहून गौरवाने फुलतेय भारतीयांची छाती
यंदा लाल किल्ल्यावर विशेष आकर्षण ठरलं ते पहिल्यांदाच देण्यात आलेली स्वदेशी तोफांची सलामी.
Independence Day 2022: देशभरात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बघवा तिकडे आज आपल्या देशाचा तिरंगा मोठ्या अभिमानाने डौलत आहे. हर घर तिरंगा ( Har Ghar Tiranga) अभियानातर्गंत देशात एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
यंदा लाल किल्ल्यावर विशेष आकर्षण ठरलं ते पहिल्यांदाच देण्यात आलेली स्वदेशी तोफांची सलामी. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधानांना 'अटॅग' या स्वदेशी तोफेतून सलामी दिली गेली. या 21 तोफामध्ये सहा ब्रिटिश पाउंडर तोफांसह स्वदेशी अटाग तोफांचा समावेश होता. यापूर्वी दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश पाउंडर गनमधून 21 तोफांची सलामी दिली जात होती.
स्वदेशी तोफेची वैशिष्ट्यं
1. DRDO द्वारे टाटा आणि भारत-फोर्ज कंपन्यांच्या सहकार्याने अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीमची निर्मिती
2. 155 x 52 कॅलिबरची ATAGS गन
3. ATAGS गनची रेंज सुमारे 48 किमी
या तोफा लवकरच भारतीय लष्कराची शक्ती वाढविण्यार आहेत.