Independence Day 2024: भारत यंदा 78 वा स्वतंत्र्यता दिवस साजरा करत आहे. देशाला स्वतंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाले आहेत. या 77 वर्षांत देशात अनेक महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. भारत विकसनशील देश आहे. देशात अनेक अमुलाग्र बदल घडून आले आहेत. सुरुवातीला देशात ज्या वस्तुंची किंमत 1 ते 2 रुपये होती त्या किंमती आता अवाक्याबाहेर गेल्या आहेत. तुम्हीदेखील कधी तुमच्या आजी-आजोबांना बोलताना ऐकलं असेलच, आमच्या काळात सगळा किराणा 1 रुपयात यायचा, 100 रुपयांत दागिने यायचे, हे संवाद प्रत्येक घरोघरी असायचे. पण हे खरंच आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक वस्तुंची किंमत कमी होती. त्यावेळी कोणत्या वस्तुंची किंमत किती होती, हे जाणून घेऊया. (Independence Day 1947)


1. डॉलरची किंमत किती होती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात स्वतंत्र झाला 1947 साली तेव्हा एका डॉलरची किंमत फक्त 4 रुपये इतकी होती. आता एका डॉलरची किंमत 83 रुपये इतकी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 20 टक्क्यांनी डॉलरचे मुल्य वाढले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीला अवमूल्यन, व्यापार असमतोल, अर्थसंकल्पीय तूट, महागाई, इंधनाच्या जागतिक किमतीत झालेली वाढ, आर्थिक संकट इत्यादी कारणीभूत आहेत.


2. सोन्याची किंमत 665 टक्क्यांनी वाढली


स्वातंत्र्यानंतर सोन्याच्या किंमतीत 737 टक्क्यांनी वाढली आहे. जर त्या काळात तुमच्याकडे सोनं असतं तर आता तुम्ही अरबपती असतात. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 रुपये होती. तर, आज सोन्याचा भाव जवळपास सत्तर हजारांवर गेला आहे. 


3. 25 रुपयांत मिळायले 1 लीटर पेट्रोल


1947 साली पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप स्वस्त होते. त्याकाळी एक लीटर पेट्रोलची किंमत 25 रुपये इतकी होती. तर आज पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर, अन्य वस्तुंच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. 


वस्तुंचे दर किती होतो.


वस्तु                1947मध्ये किती होती किंमत


1 लीटर पेट्रोल            25 रुपये
1 किलो चांदी             200
10 ग्रॅम सोनं               80 रुपये 
1 किलो साखर            40 पैसे
1 किलो तांदूळ            12 पैसे
1 लीटर दूध                12 पैसे