नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलंय. यावेळी त्यांनी सरकारच्या भावी वाटचालीचा मसुदा मांडला. स्वातंत्र्यदिन नवी प्रेरणा घेऊन येतो. कौशल्यवृद्धी म्हणजे आत्मनिर्भर भारत...आत्मनिर्भर म्हणजे आत्मविश्वास आहे. भारत अंतराळ क्षेत्रातही आत्मनिर्भर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर कृषी आत्मनिर्भर शेतकरीचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. बंधनातुन शेतकऱ्यांना मुक्त केलं असून शेतकरी कुठेही शेतमाल विकू शकतात असे ते म्हणाले. श्रमाला प्रतिष्ठा द्या. श्रमिकांनी स्वत:चा कौशल्य वाढवा असे आवाहनही त्यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ लाखाहून अधिक गावांमध्ये हजारो लाखो किलोमीटर ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे काम करण्यात येणार आहे. बदलत्या युगात सायबर स्पेसची गरज वाढलीय. अशावेळी सायबर सुरक्षा देखील खूप महत्वाची आहे. नवी सायबर सुरक्षा निती आणणार असल्याचे ते म्हणाले.



भाषणातील महत्वाचे मुद्दे


देशाच्या प्रगतीचं गौरवगान करुया 


व्होकल फॉर लोकल हा नवा संकल्प 


व्यापाराला चालना देणार 


जनधन योजनेचा गरिबांना फायदा


जलजीवन मिशनला एक वर्ष पूर्ण 


पिण्याचं पाणी हा सर्वांचा हक्क 


परकीय गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडले 


देशातल्या सुधारणांवर भर द्या 


जलजीवन योजना राज्याराज्यात लागू 


अखेरच्या स्तरापर्यंत पाणी योजना 


विकासयात्रेत मागे राहीलेल्या ११० जिल्ह्यांना सर्वांच्या बरोबरीने पुढे आणणार. 


मल्टीनोडेल कनेक्टीव्हीटी इन्फ्रा 


संकटाला तोंड देण्यास भारत सज्ज