Independence Day Offer : स्वातंत्र्य दिन आणि त्यालाच लागून आलेलं  पारसी नववर्ष, या दोन्ही दिवसांच्या मागच्यापुढच्या सुट्ट्या धरून अनेकांनीच भटकंतीसाठी जाण्याचे बेत आखले. काही मंडळी मात्र अजूनही हातातली कामं आवरून उरलेल्या आठवड्यासाठीचे काही बेत आखताना दिसत आहेत. अशा सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी. त्यातही तुम्ही विमान प्रवास करत एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बेत आखत असाल, तर तुमच्यासाठी याहून कमाल Offer नसेल हे नक्की. थोडक्यात आवडीच्या ठिकाणी तुम्हा आता अवघ्या काही तासांमध्ये पोहोचू शकणार आहात. बरं असं करत असताना हिशोब गडबडणार नाही हेसुद्धा तितकंच खरं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासात आणि तेसुद्धा विमान प्रवासात अशी अफलातून सवलत मिळण्यामागे निमित्तं ठरतोय तो म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन. देशातील काही लोकप्रिय विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या स्पाईस जेटनं ग्राहकांना, प्रवाशांना एक खास भेट दिली आहे. एका ऑफरच्या स्वरुपात ही भेट देण्यात आली असून, तुम्हीही त्याचा फायदा मिळवू शकता. कारण, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्पाईसजेटकडबव एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे प्रवाशांना अवघ्या 1515 रुपयांमध्ये विमान तिकीट उपलब्ध करून देण्याचा. 


हेसुद्धा वाचा : पाहा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली 'ही' लक्षवेधी विधानं


स्पेशल इनक्रेडिबल इंडिपेंडेंस डे ऑफर अंतर्गत स्पाईसजेटनं ही ऑफर सुरु केली असून, 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान तुम्ही तिचा लाभ घेऊ शकता. या सवलतीअंतर्गत तुम्ही 15 ऑगस्टपासून पुढील वर्षीच्या 30 मार्च 2024 पर्यंत या बजेटमध्ये कुठंही प्रवास करु शकता. त्यामुळं ही ऑफर हातची जाऊन देऊ नका. 


पाहा तुम्ही कसा घेऊ शकाल या सवलतीचा फायदा... 


Independence Day Special Offer च्या निमित्तानं स्पाईसजेटनंही प्रवाशांसाठी कमाल सवलत आणली आहे. ज्यामध्ये खिशाला फटका न देता तुम्ही विमानप्रवास करु शकणार आहात. शिवाय विमानाच्या अतिरिक्त दरावर 2 हजार रुपयांचे वाऊचरही स्पाईसजेट देत आहे. 15 रुपयांच्या अतिरिक्त किमतीवर तुम्हाला प्रेफर्ड सीट अर्थात प्राधान्याची आसनव्यवस्थाही मिळणार आहे. 20 ऑगस्टपर्यंत ही ऑफर लागू राहणार असल्यामुळं तुम्हीही शेवटच्या क्षणाला बेत आखण्याची घाई करा. 


स्पाईसजेटकडून देण्यात आलेल्या 1515 रुपयांच्या तिकीटावर तुम्ही मुंबई-गोवा, जम्मू-श्रीनगर, गोवा-मुंबई, गुवाहाटी-बागडोगरा, चेन्नई-हैदराबाद यांसारख्या देशांतर्गत ठिकाणांवर प्रवास करु शकता. ही सवलत देशांतर्गत प्रवासासाठीच्या एकमार्गी तिकीटावर लागू आहे. शिवाय First Come First Serve च्या आधारे तुम्हाला आवडीच्या आसनावरही बसता येण्याचं स्वातंत्र्य असेल. ग्रुप बुकींग्समध्ये या सवलतीचा फायदा घेता येणार नसून इतर कोणत्याही सवलतीशीही ती जोडली जाणार नाही ही बाब इथं लक्षात घ्यावी.