नवी दिल्ली : नवीन भारताचा संकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करायचा आहे. देशाच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून केले. आज भारताचा ७०वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमाच आयोजनही करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण झाले. दरम्यान तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी भाजप सत्तेवर आल्यापासून ज्याही योजना आणल्या त्यांचाही उल्लेख करत त्याचा कसा फायदा झाला ते सांगितले. तर भाजप सरकार देशाचा कसा विकास करत आहे हेही सांगितले. 


पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील मुद्दे : 


- 'ना गोली से, ना गाली से.. समस्या का हल होगा काश्मीरी लोगो को गले लगाने से' पंतप्रधान मोदींचे काश्मीर प्रश्नावर भाष्य


- आस्थेच्या नावावर हिंसाचार चालणार नाही; पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य


- रेल्वे ट्रॅक बदलते तेव्हा रेल्वेचा वेग कमी होतो. आम्ही देशाला नवीन ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र, त्याचा वेग कमी होऊ दिला नाही; पंतप्रधान मोदी


- नवीन भारतात महिलांना आपले स्वप्न पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य असेल: पंतप्रधान मोदी


- नवीन भारतात जातीयवाद, धर्मांधतेला स्थान नसणार; नवीन भारत सर्वांसाठी; पंतप्रधान मोदी


- नवीन भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक: पंतप्रधान मोदी


- जगातील सर्वात मोठा युवा वर्ग आपल्या देशात आहे, अजुनही जुन्या विचारात राहणार का; पंतप्रधान मोदी


- नोटाबंदीच्या निर्णयानंतर करदात्यांची संख्या वाढली; पंतप्रधान मोदी


- भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील:पंतप्रधान मोदी


- नोटा बंदीमुळे काळा पैसा मुख्य प्रवाहात आला; पंतप्रधान मोदींचा दावा


- सव्वा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला: पंतप्रधान मोदी


- देशात पायाभूत विकासाची कामे जोमात सुरू आहेत: पंतप्रधान मोदी


- जातीयवादाचे विष देशाचे कधीही भले करु शकत नाही; पंतप्रधान मोदी


- युवकांनी रोजगार निर्मिती करावी, मुद्रा योजनेतून अनेक युवकांनी नवीन उद्योग सुरू करुन रोजगार दिले: पंतप्रधान मोदी


- शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजनांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे: पंतप्रधान मोदी


- नैसर्गिक आपत्तींशी तोंड देत शेतकऱ्यांनी धान्यांचे विक्रमी उत्पादन केले; पंतप्रधान मोदी