नवी दिल्ली : चीनमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानं भारतात पुराचा धोका निर्माण झालंय. चीनच्या उत्तरेतल्या असणार दुष्काळी प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनंनं नवा प्रयोग सुरू केलाय. मान्सूनच्या पावसाचे ढग एका विशिष्ठ वातावरणात अडकवून त्यांच्यापासून पाऊस पाडण्याच्या चीनचा प्रयत्न आहे. प्रयोग यशस्वी झाला तर  उत्तर चीनमधला दुष्काळ दूर करण्यासाठी दरवर्षी लागणारा १० अब्ज क्युबिक  मीटर पडणार आहे.


ब्रम्हपुत्राला पुराचा धोका ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हिमालयाच्या  तिबेटमध्ये हा प्रयोग सुरू आहे.  पण याचा दुष्परिणाम चीनमधून भारतात वाहत येणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीला मोठा पुराचा धोका निर्माण होणार आहे.


चीननं पाणी अडवलं तर हा धोका काहीसा कमी होईल..पण मान्सूनचे ढग तिबेटमध्येच पाऊस देऊन गेले तर भारताच्या ईशान्येच्या सात राज्यात दुष्काळ पडण्याची शक्यता आहे .


त्यामुळे चीनच्या या जगावेगळ्या प्रयोगानं भारताची मोठी कोंडी होण्याची भीती व्यक्त होतेय....