नवी दिल्ली : China चीनकडून होणाऱ्या कोणत्याही हिंसक कारवाईला किंवा त्यांच्या सैन्याकडून सीमाभागात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी India भारतीय सुरक्षा दलांकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. यापैकीच एक पाऊल म्हणजे लडाखच्या पूर्व भागामध्ये हवाई मार्गानं शत्रूवर मारा करण्यास सज्ज असणारी शस्त्रास्त्रसज्ज विमानं आणि क्षेपणास्त्र सज्ज ठेवणं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लडाखमध्ये असणाऱ्या Galwan Valley गलवान खोऱ्यात  indiavschina भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर बऱ्याच घडामोडींची सत्र पाहायला मिळत आहेत. पूर्व लडाखमध्ये लढाऊ विमानं सज्ज ठेवण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'नं प्रसिद्ध केलं आहे. 


सैन्याच्या एअर डिफेन्स शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये आकाश क्षेपणास्त्र, The Israeli SpyDer, रशियन बनावटीचं Pechora and OSA-AK यांचा समावेश आहे. ज्यांच्या माध्यमातून लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्सना यांचं लक्ष वेधण्यास वापर केला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून फक्त भारतच नव्हे, तर चीनकडूनही सीमाभागात सैन्य आणि शस्त्रास्त्र सुसज्ज ठेवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


छाया सौजन्य- एएनआय 

 


Xinjiang आणि तिबेटमधील काही निनावी ठिकाणांवर पीपल्स लिबरेशन आर्मीतर्फे फौजफाटा वाढवण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि सीमा भागातील काही तळ सक्रिय केल्यानंतर भारतीय लष्कर आणि वायुदलाकडून या भागात संकटस्थिती उदभल्यास त्याचा सामना करण्यासाठी म्हणून एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय करण्यात आल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला या भागामध्ये सुखोई 30 s आणि अत्याधुनिक मिग- 29 या लढाऊ विमानांशिवाय भारतीय वायुदलाच्या अपाचे AH-64E हे अटॅक हेलिकॉप्टर आणि CH-47F (I) चिनूक मल्टीमिशन हेलिक़ॉप्टर्सही या भागात सज्ज ठेवण्यात आल्याचं कळत आहे.