भारतातील कोविडबाधितांची संख्या आता चीनला मागे टाकण्याच्या टप्प्यावर
कोरोनाबाधित देशांमध्ये भारताचा १२ वा क्रमांक
मुंबई : भारत लवकरच चीनला मागे टाकणार. कोवि़ड-१९ बाधित रूग्णांची संख्या ८०,००० च्या हून अधिक आहे. भारताचा कोरोनाबाधितांचा आकडा चीनच्या कोरोनाग्रस्त रूग्णांपर्यंत पोहोचला आहे. चीनमध्ये ८२,९३३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भारतात कोरोनाबाधितांची संख्या ही ८१,९७० इतकी आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, भारतात दररोज ३,७२२ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळतात. गुरूवारच्या आकडेवारीनुसार हा आकडा ७८,००३ पर्यंत पोहोचला होता. आतापर्यंत २७,९२० कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाबाधित देशांमध्ये भारताचा १२ वा क्रमांक आहे. चीनमध्ये ८२,९३३ कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा पाहिला तर भारतात २६४९ लोकांचा मृत्यू झाला आहे तर चीनमध्ये हा आकडा ४,६३७ पर्यंत पोहोचला आहे.
आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दुप्पटीने वाढल्याचं प्रमाण कमी झालं आहे. सगळ्या कोरोनाबाधित रूग्णांपैकी ३% रूग्ण हे आयसीयूत आहेत तर ०.३९% रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर २.७% रूग्ण ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीमवर आहेत. (ट्रम्प यांनी चीनला दिली मोठी धमकी; आंतरराष्ट्रीय स्तरावर भूकंप)
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या नियमांनुसार, परप्रांतीय कामगार आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यासाठी आरटी-पीसीआरवर आधारित पूलींग चाचणीसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आले आहेत. कोविडचा प्रसार शोधण्याचा पूल चाचणी हा एक प्रभावी आणि वेळ वाचविणारा मार्ग आहे.
ग्रीन झोनमध्येही पूल चाचणीचा वापर केला जात आहे. जेणे करून ग्रीन झोनमध्ये लक्ष ठेवले जाईल. गेल्या २१ दिवसांत कोणतीही कोविड-१९ केस सापडलेली नाही. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजाराच्या पार गेला आहे. दररोज १,६०२ कोरोनाबाधित नवे रूग्ण सापडत आहेत.