नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सावधानेचा इशारा दिला आहे.  गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,092 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसात 29 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे शुक्रवारी 17,070 नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या रुग्णांमध्ये थोडी वाढ झाली आहे. त्याच वेळी, देशात सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही एक लाखाच्या पुढे आहे.


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 14,684 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. 


महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना विषाणू संसर्गाची 3,249 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. केरळपाठोपाठ आता महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे.