मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांमध्ये ७८ हजार ३५७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या ३७ लाखांवर पोहोचली आहे. आता देशात कोरोना रुग्णांची संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ वर पोहोचली असून आतापर्यंत ६६ हजार ३३३ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. गेल्या २४ तासांत देशात  १ हजार ४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ८ लाख १ हजार २८२ रुग्णांवर उपचार सुरू असून २९ लाख १९ हजार ९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  


राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८,०८, ३०६ इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यातील एकूण २४,९०३ लोकांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ५२३ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वाधिक ५४ हजार ८५७ एक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात २० हजार ८६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर मुंबईत २० हजार ६७ रुग्ण उपचार घेत आहेत.