Amit Shah Fake Video Case : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राईम (Ahmedabad Cyber Crime) पथकाने दोन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी (AAP) आणि काँग्रेसशी (Congress) संबंधीत आहेत.अमित शाह (Amit Shah) यांच्या दोन सभांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने ए़डिटिंग करत ते व्हायरल करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी आहेत. सतीश वनसोल काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांचे पीए आहेत. तर आर बी बारीया आम आदमी पार्टीचे दाहोद जिल्हा प्रमुख आहेत. दोघांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना पोलिसांकडून नोटीस
फेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलीस कारवाई करत आहे, अनेक राज्यात प्रकरणी तपासही केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, नागालँड राज्यात दिल्ली पोलिसांची वेगवेगळी पथकं पाठवण्यात आली आहेत. फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचीशी चौकशी होण्याची शक्यता आहे. 


फेक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधले समाजवादी पार्टीचे लोकसभा उमेदवारालाही नोटीस पाठवण्यात आली असून तपासासाठी बोलवण्यात आलं आहे. तर झारखंडमध्ये एका काँग्रेस नेत्यालाही नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी या नेत्याला बोलवण्यात आलं आहे. नागालँडमध्येही एका काँग्रेस नेत्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. 


या सर्वांना मोबाईल बरोबर घेऊन येण्यास सांगण्यात आलंय. तेलंगनाचे मुख्यमंत्री सीएम रेड्डी यांच्यासहित सहा लोकांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. फेक व्हिडिओ प्रकरणात अनेक राज्यातील लोकांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. 


'काँग्रेसने पसरवला फेक व्हिडिओ'
अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरवला जात आहे. हा व्हिडिओ आरक्षणाशी संबंधीत आहे. अमित शाह यांनी गुवाहाटीत फेक व्हिडिओ प्रकरणी काँग्रेकवर हल्लाबोल केलाय. जनतेत खोट्या बातम्या पसरवून काँग्रेसकडून दिशाभूल केला जात असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीचा एससी, एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाला पाठिंबा आहे आणि त्याच्या संरक्षणाची भूमिका निभावेल असं अमित शाह यांनी म्हटलंय. एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर काँग्रेसने दरोडा टाकल्याचा आरोपही त्यांनी केलाय.