Old Man Jumped From 19th Floor : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडामधून  (Noida) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडाच्या सेक्टर-137 मध्ये असलेल्या सुपरटेक इकोसिटी सोसायटीमध्ये नैराश्याला कंटाळून एका वृद्धाने 19 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने पत्नीच्या पायाला स्पर्श केला आणि मला माफ कर असं म्हटलं. यानंतर तो स्टूलवर चढला आणि बाल्कनीतून खाली उडी मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमा कंपनीत होते नोकरीला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय राजकुमार हे विमा कंपनीत काम करत होते. राजकुमार हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आणि नैराश्याने त्रस्त होते. सेक्टर-137 इथल्या सुपरटेक इकोसिटी सोसायटीत ते पत्नीसोबत राहत होते.


नोएडात दाम्पत्याची आत्महत्या
नोएडामध्येही शुक्रवारी अशाच एका आत्महत्येचं प्रकरण समोर आलं होतं. कॅन्सरच्या भीतीने नोएडामध्ये एका जोडप्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर-22 मध्ये राहणारे अरुण सिंह आणि त्यांची पत्नी शशी कला यांनी राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.