लडाख : भारत आणि चीनमधील तणाव अधिक वाढताना दिसतोय. भारतीय सैन्याने पूर्व लडाखमध्ये टॅंक रेजिमेंट मैदानात आणून चीनला उत्तर दिलंय. या रेजिमेंटमध्ये भीष्म, अर्जुन सहीत अत्याधुनिक टॅंक आहेत. विरोधक चीनला यामुळे धडकी भरु शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे टॅंक कोणत्याही परिस्थितीत युद्ध करण्याची क्षमता ठेवते. या टॅंक रेजिमेंट आणल्यानंतर भारताने चीनला स्पष्ट संदेश दिलाय. युद्धजन्य स्थितीत विरोधकांच्या एरियात घुसण्यास कमी करणार नाही हे चीनला कळालंय. 



सपाट भागात टॅंक तैनात करण्यात आले. लडाख भाग हा पर्वतरांगांचा भाग आहे. LAC च्या पलिकडे अक्साई चीनचा पठारी भाग आहे. यावर टॅंक सहज धावू शकतो आणि युद्धात कामी येऊ शकतो. 


युद्ध झाल्यास त्यांच्या भूमित होईल हा संदेश या कृतीतून भारताने दिलाय.