मुंबई : Private Train: भारतातील पहिली खासगी रेल्वे सुरु झाली आहे. (Indian Railways) कोईम्बतूर (Coimbatore North) येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे शिर्डीला रवाना झाली. भारत गौरव योजनेंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या ट्रेनमध्ये 1,500 लोक एकाच वेळी प्रवास करु शकतील, अशी आसन क्षमता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारत गौरव' योजनेंतर्गत, भारतातील पहिली खाजगी रेल्वे सेवा कोईम्बतूर येथून रवाना झाली. भारतीय रेल्वेने ही गाडी एका खासगी सेवा प्रदात्याला 2 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली आहे. ही रेल्वे महिन्यातून तिनदा धावणार आहे.


1500 प्रवासी प्रवास करु शकतील


दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) बी गुग्नेसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रेल्वे कोईम्बतूर उत्तर (Coimbatore North) येथून मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी 7.25 वाजता शिर्डीतील साई नगरला (Shirdi Sai Nagar) पोहोचेल. यामध्ये 1,500 लोक एकाच वेळी प्रवास करु शकतात.


रेल्वेला 20 डबे जोडलेत


दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांने सांगितले की, रेल्वेने ही गाडी एका सर्व्हिस प्रोव्हायडर दोन वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. सेवा पुरवठादाराने कोचच्या जागांचे नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन फेऱ्या केल्या जातील. यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 डबे आहेत.


या स्थानकांवर ट्रेन थांबतील 


शिर्डीला पोहोचल्यानंतर रेल्वेला एक दिवसाची विश्रांती दिली जाईल. यानंतर ही रेल्वे शुक्रवारी साई नगर येथून पुन्हा प्रवास सुरु करेल आणि शनिवारी दुपारी १२ वाजता उत्तर कोइम्बतूरला पोहोचेल. शिर्डीला पोहोचण्यापूर्वी रेल्वे तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बंगळुरू येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी येथे थांबेल.


व्हीआयपी सुविधा मिळेल


या रेल्वेचे तिकीट दर भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणाऱ्या नियमित रेल्वेच्या बरोबरीचे आहेत. यासोबतच या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी विशेष व्हीआयपी सुविधा मिळणार आहे.



शाकाहारी जेवण


रेल्वेची देखभाल हाऊसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हायडरकडून केली जाईल, जे प्रवासादरम्यान स्वच्छतेची काळजी घेतील. रेल्वेमध्ये पारंपारिक शाकाहारी जेवण दिले जाईल. त्याचवेळी, रेल्वे पोलीस दलासह एक ट्रेन कॅप्टन, एक डॉक्टर आणि खाजगी सुरक्षा कर्मचारी ट्रेनमध्ये असतील.