Flights Bomb Threat : नागरी विमान वाहतूक मंत्रालय (Ministry of Civil Aviation) विमानात बॉम्बची धमकी देणाऱ्यांविरोधात कठोर कायदा लागू करण्याचा विचार करत आहे. धमकी देणाऱ्याची ओळख पटल्यानंतर त्या व्यक्तीला कायमचं 'नो फ्लाय' यादीत समाविष्ट करण्याबाबत कायदा आणला जाणार आहे. विमान कंपन्यांना बॉम्बची धमकी देणाऱ्या घटनांना आळा घालण्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी नागरी विमान वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत असल्याचं नागरि उड्ड्यण मंत्री के राममोहन नायडू (K.Ramamohan Naidu) यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार दिवसात विविध एअरलाईन्स (Airlines) कंपनीच्या जवळपास 25 विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. यात आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश आहे. विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळल्यानंतर विमानांच्या मार्गात बदल केला जातो. तर काही विमांनाना उड्डाण घेण्यास उशीर होतो. सुरक्षा व्यवस्थेचीही पळापळ होत असून विमान कंपन्या आणि प्रवाशांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. शोध घेतल्यानंतर या सर्व धमक्या फेक असल्याचं समोर येतं. हे रोखण्यासाठी कठोर कायदा केला जाणार आहे. 


धमकी देणारे 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितनुसार धमकी देणाऱ्याचं नाव उघड झाल्यानंतर त्या व्यक्तिला 'नो फ्लाय' यादीत (No Fly List) टाकण्याचा विचार केला जात आहे. याबाबत वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून प्रस्ताव मागवले जात आहेत. बनावट बॉम्बच्या धमक्यांना सामोरे जाण्यासाठी मंत्रालयाकडून परदेशात अवलंबल्या जात असलेल्या तरतुदींचीही तपासणी केली जात आहे. याशिवाय, आवश्यक असल्यास, खोट्या धमक्या देण्यापासून रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्तीचा विचारही केला जात आहे.


कठोर कारवाई करण्याचा विचार
विमानात गैर वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर कारवाई केली जाते. पण विमान वाहतूक नियमांनुसार बॉम्बची धमकी देणाऱ्यांविरोधात कोणत्याही कारवाईची तरतूद नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून विमान बॉम्बने उडवून देण्याच्या घटना जास्त घडतायत. सधया या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई केली जाते. पण आता विमान वाहतूक मंत्रालयाकडून अशा व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केला जाणार असल्याचा विचार केला जात आहे. 


विमान बॉम्बने उडवून देणाऱ्या व्यक्तीला नो फ्लाय यादीत टाकण्याबरोबरच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचाही विमान वाहतू मंत्रालय विचार करत आहे.