मुंबईसह भारतात आहे 3 सर्वात भयानक चर्च; दिवसाही लोक तिथे जायला घाबरतात
Scariest Churches: भारतात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक चर्च आहेत, जे त्यांच्या आश्चर्यकारक वास्तुकला आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत. पण या चर्चमध्ये काही असे आहेत ज्यांच्या भयकथा ऐकून थरकाप उडतो.
Scariest Churches : देशभरात ख्रिसमसचा उत्सव पाहिला मिळतोय. 25 डिसेंबर साजरा होणारा हा सण लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहिला मिळतो. हा सण येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि ख्रिश्चन धर्माचा सर्वात महत्वाचा सण आहे. मुंबईपासून जगभरात ख्रिसमसनिमित्त प्रत्येक गल्ली बोळ्यात चमकणाऱ्या दिव्यांनी रोशनाई सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. चर्चमध्ये लोकांचा गर्दी पाहिला मिळतोय. येशूच्या जन्मानिमित्त चर्चमध्ये मेणबत्ता लावून प्रार्थना करण्यात येत आहे. भारतासह जगभरातील चर्चमध्ये ख्रिसमसचा उत्साह दिसतोय. हे चर्च रोषणाईने झगमगलेय. पण तुम्हाला माहितीये का भारतातील 3 चर्चचे नाव घेतल्यावर घाबरायला होतं. हो अगदी बरोबर वाचलं. या तीन चर्चमध्ये दिवसाढवळ्याही लोकांना जायला भीती वाटते.
भारतातील 3 सर्वात भयानक चर्च?
भारतात अनेक ऐतिहासिक आणि सुंदर चर्च आहेत, ज्यांच्या कथाही आश्चर्यकारक आहेत. अशी काही चर्च आहेत जी त्यांच्या भयानक कथांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. तुम्ही कधी या चर्चबद्दल ऐकलंय का, नाही तर आज आम्ही तुम्हाला ती चर्च कुठे आहेत ते सांगणार आहोत. रात्री विसरून जा, लोक दिवसा उजाडतानाही या चर्चमध्ये जाण्यापूर्वी दोनदा विचार करतात.
थ्री किंग्स चॅपल चर्च
जर आपण भारतातील सर्वात भयानक चर्चबद्दल बोललो तर गोव्यातील थ्री किंग्स चॅपल चर्चचे नाव सर्वात पहिले घ्यायला हवं. सुंदर समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक चर्चसाठी प्रसिद्ध असलेले गोव्यातील हे चर्च आपल्या भीतीदायक इतिहासासाठी ओळखलं जातं.
या चर्चशी संबंधित अशी कथा सांगण्यात येते की, इथे तीन पोर्तुगीज राजे मरण पावले. असे म्हणतात की सत्तेच्या लोभापोटी एका राजाने इतर दोन राजांना विष देऊन मारले होते. मात्र त्याचे कृत्य उघड होत असल्याचे पाहून त्याने स्वत: आत्महत्या केली. तेव्हापासून या तिघांचे आत्मा चर्चच्या आवारात फिरत असल्याची समज इथे लोक मानतात.
सेंट जॉन बाप्टिस्ट
मुंबईत असलेल्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चचे नाव भारताच्या भीतीदायक चर्चेत सहभागी आहे. हे चर्च आपल्या भयानक कथांमुळे प्रसिद्ध आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, रात्री इथे तरुण आणि वधूच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात. दोघांनीही जवळच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे, तेव्हापासून त्यांचे आत्मा इथे भटकत अशी दंतकथा आहे.
कदमट्टम चर्च
कदमट्टम चर्च केरळमधील एक प्रसिद्ध आणि रहस्यमय चर्च आहे. दक्षिण भारतातील सौंदर्यासोबतच हे चर्च त्याच्या भयकथांसाठी देखील ओळखलं जातं. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या संशोधनात एका साधूने एका मुलाला त्याच्या शक्तीने मारहाण होण्यापासून वाचवले होते. त्यामुळे ते काळ्या जादूचे केंद्र मानलं जातं.