नवी दिल्ली : भाजप खासदार रवी किशन यांनी भारत हे हिंदुराष्ट्र असल्याचे विधान केले आहे. याप्रकरणी आता वाद उफाळण्याची शक्यता आहे. भारतात १०० कोटी इतकी हिंदुची संख्या आहे. त्यामुळे हा देश हिंदुचाच असल्याचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी केले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मोदी सरकारने आज संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. या पार्श्वभुमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या विधेयकाचे समर्थन केले. देशात ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक बहुसंख्य असताना हिंदुंचे स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख टीकून असल्याचे रवी किशन यावेळी म्हणाले.