नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थितीविषयी अरुण जेटली यांनी लोकसभेत माहिती दिली. ‘नियंत्रण रेषेच्या संरक्षणासाठी भारतीय जवान तैनात आहेत. पश्चिम सीमेवर भारतीय सैन्याचे पूर्णपणे वर्चस्व आहे.  नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबद्दल लोकसभेत भैरो प्रसाद मिश्र यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आला होता, त्याला अरूण जेटली यांनी उत्तर दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ‘पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाली आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न करताना अनेकदा भारतीय जवान शहीद झाले आहेत,’ असे जेटली यांनी लोकसभेत बोलताना म्हटले.  आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असून भारतीय जवानांमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले जात असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. 


पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच जम्मू काश्मीरसह पंजाबमध्ये होणारी घुसखोरी पूर्णपणे रोखण्यातही जवानांना यश आले आहे. मात्र तरीही पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत,’ अशी माहिती जेटली यांनी सभागृहाला दिली.