कोरोनाचे संकट : संपूर्ण देश लॉकडाऊन; काय राहणार बंद, काय राहणार सुरु
संपूर्ण देश लॉकडाऊन. हे लॉकडाऊन २१ दिवस असणार आहे. यावेळी काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार?
नवी दिल्ली : जगावर कोरोनाचे ढग एकदम गडद होत चालले आहेत. चीन, इटली, अमेरिका या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आता भारतातही हे संकट घोंघावत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेत. काही राज्यांत लॉकडाऊन करण्यात आले, मात्र, कोरोनाचा फैलाव थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे जतना कर्फ्यू लावण्यात आला. तसेच जमावबंदीही लागू करण्यात आली. तरीही लोक घराबाहेर पडत आहेत. म्हणून अनेक राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली. तरीही लोक गंभीर धोका लक्षात न घेता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे आत केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन करुन टाकले. हे लॉकडाऊन २१ दिवस म्हणजे १५ एप्रिलपर्यंत असणार आहे. लोकांनी अत्यंत गरज असेल तरच बाहेर पडायचे आहे. अन्यथा घरीच राहायचे आहे. त्यामुळे अनेकांना यामुळे खूपच धास्ती आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे संपूर्ण देश लॉकडाऊन, मग घरी राहल्यावर काय खाणार, असा अनेकांना प्रश्न पडलाय.
काय राहणार बंद, काय राहणार सुरु
संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या जाळ्यात हळूहळू ओढविण्याची शक्यता आहे. देशातील कोरोना बाधितांच्या बळींची संख्या आता वाढून ४९२ झाली आहे. यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कोविड -१९ पासून आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड१९ मध्ये जगभरात ३ लाख ८० हजारांहून अधिक रुग्ण आहेत आणि १६,४९७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातही असेच संकट येऊ शकते, याची केंद्र सरकार आणि राज्य सरकारला वाढत्या कोरोनाच्या फैलावरुन दिसून येत आहे. त्यामुळे मोठे पाऊल उचलावे लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवाली कोरोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या २१ दिवसांसाठी 'भारत लॉकडाऊन'ची घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु होणार आहे. या दरम्यान, पुढचे २१ दिवस कोणत्या सेवा सुरू राहणार आहेत आणि कोणत्या गोष्टी बंद राहतील हे जाणून घेणे नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
यातून यांना सूट
- आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बंद होणार नाहीत.
- मेडिकल, लॅब आणि रेशनिंग दुकानंही सुरु राहतील.
- डॉक्टरांकडेही जाता येईल.
- रुग्णालय, दवाखाने, डिस्पेन्सरी, नर्सिंग होम सुरु राहतील.
- पेट्रोल, सीएनजी, एलपीजी यांसारख्या सुविधा सुरु राहतील.
- खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे ही दुकाने
- क्वारंन्टाईन सुविधेसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीही सुरु राहतील.
अतिशय आवश्यक असेल तेव्हाच
- खासगी गाड्यांना अतिशय आवश्यक असेल तेव्हाच रस्त्यावरून प्रवासासाठी परवानगी
- लोकांना केवळ मेडिकल, रेशनिंग, औषधे, दूध आणि भाज्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची परवानगी
- खाद्यपदार्थ, औषधे, मेडिकल इक्विपमेंट यांचा पुरवठा ई-कॉमर्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार- - अॅम्बुलन्स सेवाही सुरु राहील.
- मेडिकल कर्मचारी, नर्स, पॅरा-मेडिकल स्टाफ आणि रुग्णालयाचा सपोर्ट स्टाफ यांना प्रवासाची मुभा
या ठिकाणी बंदी
- सार्वजनिक स्थळे. यात मॉल, हॉल, जिम, स्पा, स्पोर्टस क्लब बंद राहतील.
- सर्व रेस्टॉरन्ट, दुकाने इत्यादी बंद राहतील.
- शिक्षण संस्था, ट्रेनिंग, रीसर्च, कोचिंग संस्था बंद
- धार्मिक आणि पूजास्थळ बंद राहतील.
- कोणत्याही धार्मिक कार्यक्रम आयोजनाची परवनागी नाही.
- शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांना परवनागी नाही
- सर्व फॅक्टरी, वर्कशॉप, कार्यालय, गोडाऊन, आठवडा बाजार बंद
काय सुरु राहणार
- अत्यावश्याक सेवा, तुरुंग, वीज, पाणी आणि सॅनिटेशनचे काम
- जिल्हा प्रशासन, राजकोष, डिफेन्स, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राजकोष, डिझास्टर मॅनेजमेंट,
- वीज उत्पादने आणि ट्रान्समिशन युनिट,
- पोस्ट ऑफिस, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, बॅंक एटीएम
- पोलीस, होम गार्ड, सिव्हिल डिफेन्स, अग्निशमन दल
- वायु-जल परिवहनाच्या क्रूसाठी हॉटेल, होम स्टे, लॉज आणि मोटल
- लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि इतरांसाठी, मेडिकल आणि एमर्जन्सी स्टाफसाठी हॉटेल, होम स्टे, लॉज