मुंबई : भारत सध्या एक अत्याधुनिक हत्यार तयार करत आहे. जे अत्यंत शक्तीशाली असणार आहे.


लेझर लाईट हत्यार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत हा येत्या काळात डायरेक्ट लेझर लाईट हत्यार बनवत आहे. जे शत्रूचा ड्रोन हवेतच नष्ट करून टाकेल. या हत्यारचं नाव आहे डायरेक्ट एनर्जी वेपन. हे हत्यार डीआरडीच्या मदतीने बनवलं जात आहे.


उच्च क्षमतेच्या लेझर बीम


या हत्यारात उच्च क्षमतेच्या लेझर बीमचा वापर केला जाणार आहे. हे लेझर बीम मायक्रोवेव आणि विद्युत चुंबक स्पेक्ट्रम वर काम करेल. हे हत्यार एक निश्चित ठिकाणी लावलं जाणार. त्याच ठिकाणावरून हे हत्यार शत्रूचा ड्रोन हवेतच नाश करू शकतो.


भारत दुसरा देश


डी आर डी ओचं म्हणणे आहे की, हे हत्यार भारताच्या विमानांमध्ये देखील लावलं जाऊ शकतं. जे शत्रूची विमानं हवेतच नाश करू शकतात. आतापर्यंत हे हत्यार अमेरिका वापरत होतं त्यानंतर आता भारताकडे हे हत्यार असणार आहे. भारत हे हत्यार वापरणार दुसरा देश असेल.