राहुल गांधी यांनी शिवलेल्या चप्पलला 2 लाखांची ऑफर, रामचेत म्हणतात `एक कोटी दिले तर...`
Rahul Gandhi slippers stitched : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सुलतानपूरमध्ये एका चप्पलच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी स्वत: चप्पल शिवली. आता ही चप्पल विकत घेण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर येत आहेत.
Rahul Gandhi slippers stitched : उत्तर प्रदेशमधल्या अमेठी इथल्या सुलतानपूरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका चप्पलच्या दुकानाला भेट दिली होती. यावेळी राहुल गांधी यांनी स्वत: चप्पल शिवली. आता ही चप्पल (Slippers) विकत घेण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर येत आहेत. चप्पलच्या दुकानाचे मालक रामचेत यांना एका व्यक्तीने ही चप्पल खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. पण रामचेत यांनी ही ऑफर धुडकावून लावली. सुलतानपूरमधल्या एमपी-एमएलए कोर्टात हजर झाल्यानंतर 26 जुलैला राहुल गांधी अचानक रामचेत यांच्या दुकानात पोहोचले.
राहुश गांधी यांनी चप्पल दुकाचे मालक रामचेत (Ramchet) यांच्याशी जवळपास अर्धातास गप्पा मारल्या. यावेळी राहुल गांधी यांनी एका तुटलेल्या चप्पलला टाके घातले. आता ही चप्पल खरेदी करण्यासाठी अनेक ऑफर्स येत असल्याचा दावा रामचेत यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी टिका केली होती. यावर राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला असून यासंदर्भात ते सुलतानपूर कोर्टात दाखल झाले होते. कोर्टातून निघताना राहुल गांधी हे रामचेत दुकानाला भेट दिली. रामचेतबरोबर गप्पा मारत असताना राहुल गांधी यांनी उत्सुकता म्हणून तिथल्या एका तुटलेल्या चप्पलला टाके घातले. तसंच एक बूटही त्यांनी चिकटवून नीट केला. सुलतानपूरवरुन दिल्लीला पोहोचताच राहुल गांधी यांनी रामचेत यांना चप्पल शिवण्याची एक इलेक्ट्रीक मशीन भेट दिली.
चप्पलला 2 लाख रुपयांची ऑफर
राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर रामचेत यांच्या दुकानावर ग्राहकांची रिघ लागली आहे. विशेष म्हणजे अनेक ग्राहकांना राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल आणि बूट विकत घ्यायचे आहेत. एका व्यक्तीने तर ती चप्पल घेण्यासाठी थेट दोन लाख रुपयांची ऑफर दिली आहे. पण रामचेत यांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे. राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल आपण फ्रेम करणार असून स्मृती चिन्ह म्हणून ती आयुष्यभर आपल्या जवळ ठेवणार असल्याचं रामचेत यांनी म्हटलं आहे. या चप्पलला कोणी एक कोटी रुपये दिले तरी आपण ती चप्पल देणार नसल्याचंही रामचेत यांनी सांगितलं.
मीडिाय रिपोर्टनुसार रामचेत आता एक सेलिब्रेटी बनले आहेत. दूरवरुन लोकं रामचेत यांच्या दुकानावर राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल आणि बूट पाहण्यासाठी येतात. इतकंच नाही तर रामचेत यांच्या दुकानातील चप्पल आणि बुटांच्या विक्रीचा खपही वाढला आहे.