Beggars In Hotel : दिवसा शहरातील रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये फिरून भीक मागणाऱ्या एका टोळीला महिला आणि बाल विकास विभागाने अटक केली आहे. भीक मागून ही टोळी चांगली कमाई करायचे. या टोळीत एकूण 22 जण आहेत.  यात 11 अल्पवयीन मुलं आहेत. तर 11 महिलांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे भिकारी  (Beggars) दिवसा भीक मागायचे आणि रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करायचे. या सर्वांना महिला आणि बाल विकास विभागाने छापा टाकून एका हॉटेलमधून अटक केली. भिकाऱ्यांची लाईफस्टाईल पाहून अधिकारी देखील हैराण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 भिकाऱ्यांची टोळी
रात्रभर हॉटेलच्या एसी रुममध्ये आराम केल्यानंतर हे सर्व भिकारी सकाळी शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये फिरून भीक मागायचे. मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये (Indore) या सर्वांना अटक करण्यात आली. टोळीतल सर्व सदस्य हे मूळचे राजस्थानचे असून त्यांना महिला आणि बाल विकास विभागाने अटक करुन त्यांच्या मूळगवी पाठवून दिलं. विभागाला मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी राजस्थानमधून भीक मागणारी 22 जणांची टोळी एका हॉटेलमध्ये थांबल्याचं त्यांना दिसलं. 


रात्री हॉटेलमध्ये मुक्कामी
22 जणांच्या या टोळीत 11 अल्पवयीन मुलं आणि 11 महिलांचा समावेश आहे. भिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्याने इंदोर शहरातील सर्व हॉटेल, लॉज आणि आश्रम शाळांसाठी नोटीस जारी केली आहे. भिक्षावृ्त्ती असलेल्या लोकांना जागा देण्याआधीत त्यांची माहिती घेऊन पोलिसां कळवावी, अन्यथा चालकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीशीत नमुद करण्यात आलं आहे.


राजस्थानमधून मध्यप्रदेशमध्ये आलेली भिकाऱ्यांच्या टोळीतील प्रत्येकी एक महिला एका लहान मुलाला घेऊन शहरातील रस्त्यांवर भीक मागायच्या मुलगा आजारी आणि दिवसभर उपाशी असल्याचं सांगत त्या लोकांकडून पैसे मागायच्या. यातून प्रत्येकी एक महिला दिवसभरात हजार रुपये कमवाईची. त्यानंतर शहरातील एखाद्या हॉटेलमध्ये रात्रीचं जेऊन करुन ही टोळी हॉटेलमध्येच झोपायची. 


भिकारीमुक्त अभियान
इंदोरसहित देशातील दहा प्रमुख शहरात भिकारीमुक्त अभियान राबवलं जात आहे. याअंतर्गतच महिला आणि बाल विकास विभागाने ही कारवाई केलीय.