Fatwa For Ganesh Puja: गणेशोत्सवात नवा वाद, घरी गणपती बसवल्याने मुस्लीम महिलेविरुद्ध फतवा
मुस्लीम महिलेनं घरी गणपती बसवल्याने मौलवींचा फतवा, मुस्लीम महिलेने दिलं उत्तर
Ganpati Puja: गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2022) एक नवा वाद उभा राहिला आहे. एका मुस्लीम कुटुंबाने घरी गणपतीची स्थापना केल्याने त्या कुटुंबाविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. रुबी आसिफ खान (Rubi Khan) असं या महिलेचं नाव तिच्याविरोधात असून मौलवींनी संताप व्यक्त केला आहे. मुस्लिमांनी फक्त अल्लाहचीच भक्ती करावी असा दावा मौलवी मुफ्ती अरशद यांनी केला आहे.
मुस्लीम कुटुंबात गणपतीची स्थापना
हे प्रकरण उत्तर प्रदेशमधल्या अलीगढमधल्या रोरावर परिसरातलं आहे. इथल्या एडीए कॉलोनीत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रुबी आसिफ खान आपले पती आसिफ खान आणि मुलांसोबत रहातात. त्यांनी यंदा आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. रुबी आसिफ यांनी म्हटलंय, यंदा मी सात दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे आणि कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव मानत नाही. आम्ही सर्व धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे करतो. आम्हाला यात आनंद मिळतो. पूजा केल्यामुळे याआधीही आपल्याविरोधात फताव जारी केल्याचं रुबी आसिफ खान यांनी म्हटलंय.
फतवा जारी करणाऱ्या मौलवींना सुनावलं
रुबी आसिफ खान यांनी हिंदू देवतांच्या पूजा केली म्हणून फतवा जारी करणाऱ्या सहारनपूरच्या मुफ्ती अर्शद फारुकी यांच्यावर टीका केली आहे. या लोकांना देशाचं विभाजन करायचे आहे, असे मौलवी कधीच खरे मुस्लिम असू शकत नाहीत, ते अतिरेकी आहेत आणि जिहादी आहेत असं रुबी आसिफ खान यांनी म्हटलं आहे. या लोकांना स्वतःहून भेदभाव करायचा आहे. ते भारतात राहून भारताबद्दल बोलत नाहीत, फतवे काढणारे जिहादी लोक आहेत, जर ते खरे मुस्लिम असते तर त्यांनी अशा प्रकाराचा फतवा जारी केला नसता असं रुबी आसिफ खान यांनी म्हटलं आहे.