Police beaten by Old man : पोलीस म्हणजे जनतेचे मित्र. सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच तप्तर असतात. पण कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे तेच बेजबाबदारपणे वागू लागले तर. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत एक पोलीस एका वृद्धाला अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. जबलपूर रेल्वे स्टेशनवरचा हा व्हिडिओ असून 28 सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर लोकं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 


व्हिडिओमध्ये एक पोलीस एका वृद्धाला प्लॅटफॉर्मवर ओढत नेतोय, नंतर त्याला लाथ मारताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस त्या व्यक्तीला रेल्वे ट्रॅकजवळ लटकवत मारहाण करतानाही दिसत आहे.


समोरच्या प्लॅटफॉर्मवरील एका दक्ष नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. इतकंच नाहीतर काही जणांनी सरकारलाही जाब विचारला आहे.