Bharat Band : आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आलीय. सुप्रीम कोर्टानं SC, ST आरक्षणाचं वर्गिकरण करण्याचा निर्णय दिलाय. क्रिमिलेअरची अटही घालण्यात आलीय.. त्यामुळे केंद्र सरकारनं याबाबत हस्तक्षेप करावा या मागणीसाठी भारत बंदची हाक देण्यात आलीय. महाराष्ट्र्रातलही या बंदचे पडसाद पाहायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पटनात एसडीएमला बदडलं
बिहारची राजधानी पटनातही भारत बंद पुकारण्यात आला होता. काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. यासाठी पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यादरम्यान अचानक आंदोलक हिंसक झाले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठिमार केला. पण यादरम्यान एका पोलिसाने चक्क उपविभागीय दंडाधिकाऱ्यालाच (Sub-Divisional Magistrate) काठिने बदडलं. यामुळे पोलीस आणि प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला. एसडीएमला काठिने बदडत असताना एका सीनिअर पोलीस अधिकाऱ्याने पाहिलं, आणि त्याने एसडीएमला जवानापासून वेगळं केलं. 


मारहाणीमुळे एसडीएम चांगलेच संतापले आणि त्यांनी पोलिसांशी वाद घातला. शेवटी शिपायाने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची माफी मागितली. सर आपल्या कडून चुकून मारहाण झाली असं सांगत पोलिसांनी माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


भारत बंद दरम्यान पटनात काही आंदोलकांकडून हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पटना शहरातील बाजार बंद करण्यात आाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठिमार केला. यामुळे आंदोलन आणखी चिघळलं.



यादरम्यान उपाविभागीय दंडाधिकारी पोलिसांना आदेश देत एक हातगाडीजवळ उभे होते. हातगाडीच्या बाजूला असलेला जनरेटर बंद करण्याचे आदेश ते कर्मचाऱ्यांना देत होते. त्याचवेळी जमावावर लाठिमार करत पोलीस एसडीएम उभे असलेल्या ठिकाणी आले. त्यातल्या एका जमावाने चक्क एसडीएमच्या पाठिवर काठीने जोरदार प्रहार केला. त्याचवेळी तिथे असलेल्या एका सीनिअर पोलीस अधिकाऱ्याने हा प्रकार पाहिला आणि त्याने शिपायाला रोखलं. घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसंनी एसडीएमची माफी मागितली.