नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५३ लाखांवर गेली आहे. मात्र देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, या धोकादायक विषणूवर मात करणऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. भारताने कोरोना रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९३,३३७ रुग्णांची नोंद झाली. देशातील ९५ हजार ८८५ जण करोनामुक्त झाले आहे. दिलासादायक म्हणजे देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट  ७९.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात ४२ लाख रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्याचं देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. 



दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९३,३३७ रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या १२४७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३,०८,०१५ इतकी झाली आहे. यापैकी १०,१३,९६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 


तर देशातील ४२,०८,४३२ जणांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशातील ८५,६१९ जणांनी प्राण गमावले आहेत. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे.