बंगळुरु : भारत स्वत:चे अवकाशात अंतराळ स्थानक निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी महत्वाची योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असेल, महत्वाकांक्षी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ जुलै रोजी चांद्रयान-२ चे उड्डान झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यातही आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे  इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे.



अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला ‘गगनयान’ कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करीत आहे. ‘गगनयान’ मोहिमेचा पुढील भाग असेल असेही डॉ. सिवन यांनी स्पष्ट केले आहे.


तसेच भारताने चांद्रायन-२ नंतर शुक्र आणि सूर्य यांच्या अभ्यासाचे ध्येय निश्चत केले आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमेसाठी भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत. एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे. या पंक्तित भारताचे स्थान असेल, असा दावा करण्यात आला आहे.