PM Modi Total Income: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची (Property) घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जीवन बीमा पॉलिसी (Policy) नाही. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीक संपली आहे. पीएम मोदी यांच्या खात्यात हजाराहून कमी म्हणजे केवळ 574 रुपये आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत पीएम मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्याकडे कोणताही शेअर  नाहीए, किंवा म्युच्यूअल फंडमध्ये त्यांची गुंतवणूक नाहीए. इतकंच काय तर पीएम मोदी यांच्या नावावर एकही कार (Four Wheelar) नाहीए. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PMO वेबसाईटवर माहिती
ही सर्व माहिती प्राइम मिनिस्टर ऑफिसच्या म्हणजे PMO च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. यावर पीएम मोदी यांच्या सर्व संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईवर दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदी यांच्याकडे सोन्याच्या चार रिंग आहेत, ज्याची किंमत  2,01,660 इतकी आहे. याशिवाय कोणतीही प्रॉपर्टी पीएमच्या नावावर नाहीए. 


बँकेत केवळ 574 रुपये
पीएम मोदी यांच्याकजे केवळ 30,240 रुपये कॅश आहे. तर बँकेत केवळ 574 रुपये आहेत. पीएम मोदी यांच्या एफडी मात्र चांगली आहे. यात 2 कोटी 47 लाख 44 हजार रुपये आहेत. तर पोस्ट ऑफिसच्या नॅशनल स्कीममध्ये 9 लाख 19 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. पीएम मोदी यांचं बँक अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडियात आहे. 


पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सर्व संपत्तीची मोजदाद केली तर पीएम मोदी यांची एकूण संपत्ती 2 कोटी 58 लाख 96 हजार रुपये इतकी आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी दरवर्षी ही माहिती दिली जाते. गेल्यावर्षीच्या तुलनेत पीएम मोदी यांच्या संपत्तीत चार टक्के वाढ झाली आहे.