मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजच अर्ज करा कारण उरले फक्त दोन दिवस. सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची हीच शेवटची संधी आहे. सरकारी नोकरीसाठी कसा आणि कुठे करायचा अर्ज जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टात 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रिक्त जागेसाठी India Postच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तिथे तुम्हाला रिक्त जागांबाबत अधिक माहिती मिळेल. 


याशिवाय indiapostgdsonline.gov.in/Notifications/Model च्या आधारे तुम्हाला पोस्टातील रिक्त जागांची माहिती मिळू शकणार आहे. तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता आणि अर्जही करू शकता. 38,926 पदांसाठी पोस्टात मेगा भरती आहे.   


या रिक्त जागांसाठी 5 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. 5 जून अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. 38,926 रिक्त पदांसाठी या जागा निघाल्या आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 40 वर्ष असायला हवं असं सांगितलं. 


इच्छुक उमेदवार दहावी पास असणं गरजेचं आहे. त्याला बोर्डासाठी गणित आणि इंग्रजी विषय असायला हवेत. त्याला स्थानिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. बीपीएमसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 12 हजार रुपये पगार मिळणार आहे. तर एबीपीएम/ पोस्टमनच्या पदासाठी 10 हजार रुपये पगार आहे.