मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank) 1 एप्रिलपासून पैसे काढणे आणि जमा करण्याचे नियम बदलणार आहे. अधिकवेळा पैसे काढण्यावर आणि जमा करण्यावर आता शुल्क आकारलं जाईल. नव्या नियमानुसार महिन्यातून चारवेळा बेसिक बचत खात्यातून केलेले व्यवहार मोफत असतील. त्यानंतर रोख रक्कम काढल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व सामान्यांना बँकेची सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून बँक सेवा देण्यात आली. त्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली. देशभर ग्रामीण भागात डिजिटल आर्थिक व्यवहार करता यावा यासाठी पोस्टाची बँके सेवा सुरु झाली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. मात्र, इंडिया पोस्ट बँकेच्या नव्या नियमामुळे सामान्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे.


टपाल विभागाच्यावतीने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने डिजिटल वित्तीय आणि सहाय्यित बँकिंग सेवा उपलब्ध करुन दिली. जी पोस्टल नेटवर्कद्वारे समाजातील विविध घटकांच्या, विशेषकरुन ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पुरवल्या जातात. या सेवांमध्ये अनेक प्रकारच्या युटिलिटी आणि बँकिंग सेवांसाठी देय देण्यासाठी विनामूल्य सेवा केली होती. आता 1 एप्रिल 2021 नुसार नवीन नियमावली लागू होणार आहे. त्यामुळे काही सुविधांनासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. 


इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (India Post Payments Bank) नव्या नियमामुसार महागणार आहेत. अधिकवेळा पैसे काढण्यावर आणि जमा करण्यावर आता शुल्क आकारलं जाईल. नव्या नियमानुसार महिन्यातून चारवेळा बेसिक बचत खात्यातून केलेले व्यवहार मोफत असतील. त्यानंतर रोख रक्कम काढल्यास 0.50 टक्के किंवा जास्तीत जास्त 25 रूपये शुल्क घेतले जाईल. सेव्हींग किंवा करंट खात्यात 25 हजारांपर्यंत रोकड काढण्यासाठी शुल्क नसेल. त्याहून अधिक पैसे काढल्यास पैसे काढण्याच्या 0.50 टक्के किंवा किमान 25 रुपये द्यावे लागतील. मूलभूत बचत खातेधारकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट मर्यादा निश्चित केलेली नाही.