भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, `ही` घ्या अर्जाची लिंक
फक्त दहावी उत्तीर्ण असेल तर तुला कुठे नोकरी मिळणार? असा प्रश्न विचारला जातो. पण आता काळजी करु नका. तुमचे शिक्षण कमी असले तरी तुम्हाला जास्त पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. दहावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी चालून आली आहे.
India Post GDS Recruitment 2023: फक्त दहावी उत्तीर्ण असेल तर तुला कुठे नोकरी मिळणार? असा प्रश्न विचारला जातो. पण आता काळजी करु नका. तुमचे शिक्षण कमी असले तरी तुम्हाला जास्त पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. दहावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी चालून आली आहे.
इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी बंपर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचे सविस्तर नोटिफिकेशन असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
रिक्त जागांचा तपशील आणि वयोमर्यादा
या भरतीद्वारे तब्बव 30 हजार 041 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल 'इतक्या' पगाराची नोकरी
शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यावेळी गणित आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय असावे.
उमेदवाराकडे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये GDS च्या मंजूर श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल. अर्जदारांना किमान माध्यमिक इयत्तेपर्यंत स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 'शिका आणि कमवा'; डिप्लोमा, ITI उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
अर्ज शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.महिला/ट्रान्स-महिला उमेदवार आणि एससी/एसटी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.
India Post GDS Job: असा करा अर्ज
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
होमपेजवर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसाठी पुढे क्लिक करा.
अर्ज शुल्क भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढा.
अर्जाची शेवटची तारीख
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना 24 ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
रेल्वेत तब्बल अडीच लाख पदे रिक्त, जाणून घ्या तपशील
Railway Job: देशभरातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतरत्र नोकरीसाठी अर्ज केला असाल. पण भारतीय रेल्वेअंतर्गत शेकडो, हजारो नव्हे तर तब्बल अडीच लाख पदे रिक्त आहेत. ही पदभरती पूर्ण केल्यास देशातील अडीच लाख बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये ग्रुप सी पदांवर 2 लाख 48 हजार 895 पदे रिक्त आहेत. तर ग्रुप ए आणि बी मध्ये 2070 पदे रिक्त आहेत.