श्रीमंत देशांंच्या यादीमध्ये भारत सहाव्या स्थानी !
यंदाचा आर्थिक संकल्प जाहीर होण्याआधी एक खास बातमी आहे.
मुंबई : यंदाचा आर्थिक संकल्प जाहीर होण्याआधी एक खास बातमी आहे.
जगात श्रीमंत देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार न्यू वर्ल्ड वेल्थ संघटनेच्या रिपोर्टनुसार, अमेरिका अव्वल स्थानी तर भारत सहाव्या स्थानी आहे.
2017 च्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेकडे 64,584 अरब डॉलरची संपत्ती आहे. त्यापाठोपाठ चीनकडे 24,803 अरब डॉलर तर जपानकडे 19,522 अरब डॉलर संपत्ती आहे.
जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये नागरिकांच्या संपत्तीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी पैशांचा समावेश करण्यात आलेला नाही. रिपोर्टनुसार ब्रिटन चौथ्या स्थानी (9,919 अरब डॉलर) त्यापाठोपाठ
जर्मनी (9,660 अरब डॉलर),फ्रान्स (6,649 अरब डॉलर),कॅनडा (6,393 अरब डॉलर),ऑस्ट्रेलिया (6,142 अरब डॉलर) आणि इटली (4,276 अरब डॉलर) चा क्रमांक लागतो.
भारताची शान वाढवणार्या काही गोष्टी
2017च्या रिपोर्टमध्ये सर्वात उत्तम कामगिरी करणार्या देशांच्या यादीमध्ये भारताचा उल्लेख करण्यात आला आहे.
मागील दशकाच्या तुलनेत भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे. (2007-17) दरम्यान संपत्तीमध्ये 160% वाढ आहे.
करोडपतींच्या यादींमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. देशात 20,730 कोट्याधीश आहेत.
अरबपतींच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिका, चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो. देशात 119 अरबपती आहेत.