महत्त्वाची दिलासादायक बातमी! पहिल्यांदा 2 लाखांपेक्षा कमी नव्या कोरोना रूग्णांची नोंद
देशातील महत्त्वाची पण दिलासा देणारी बातमी
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असताना 14 एप्रिलनंतर आज 2 लाखांपेक्षा कमी कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोरोना रूग्णसंख्येबद्दल दिलासा देणारी बाब आहे. रूग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. गेल्या 24 तासांत देशात 12 लाख 96 हजार 427 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. तर 3 हजार 511 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 26 हजार 850 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,69,48,874 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,07,231 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 25,86,782 इतकी आहे. भारतात आतापर्यंत 19,85,38,999 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २२ हजार १२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. राज्यात एकूण ३ लाख २७ हजार ५८० रूग्ण उपचार घेत आहेत.