Coronavirus Cases In India: भारतात गेल्या 24 तासांत 1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाचा कहर : 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
मुंबई : देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय भयंकर असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कोरोनाची ही लाट शमवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाऊनदेखील करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील कोरोना रूग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोनाचा कहर पाहाता गेल्या 24 तासांत भारतात 1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत भारतात 1 लाख 80 हजार 530 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1, 31,08,8582 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. देशात 20 लाख 31 हजार 977 रूग्मांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज ३५१ करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे.