मुंबई : देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरत असताना, सतत तिसऱ्या लाटेचे संकेत वर्तवण्यात येत होते. आता कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. एका आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये  1.9 लाख रूग्ण म्हणजेच 65 टक्क्यांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद  केरळमध्ये झाली. आता भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 42 हजार 909 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता  प्रत्येकाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर देशात रविवारी 380 जणांने कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या 24 तासांत 34 हजार 763 कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.51 टक्क्यांवर आहे. आतापर्यंत करोनातून 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 रुग्ण बरे झाले आहेत.



गेल्या 24 तासांत देशात 32 लाख 14 हजार 696 जणांना करोनाची लस देण्यात आली आहे.यासह एकूण लसीकरण 63.43 टक्क्यांवर झालं आहे. फक्त देशातचं नाही तर महाराष्ट्रात देखील नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात 4हजार 666 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


रविवारी राज्यात एकून 131 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर, 3 हजार 510  रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97 टक्क्यांवर आहे.