मुंबई: भारतानेही करून दाखवलं आहे. सलग 76 व्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट दिसत आहे. गेल्या 24 तासांत नव्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. त्यामुळे कोरोना घटतोय हे आता दिसत आहे. त्याच बरोबर सरकारने मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहिमेवरही भर दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. 76 दिवसांनंतर आज अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत 62 हजार 597 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 1452 कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 2 कोटी 95 लाख 70 हजार 35 वर पोहोचला आहे.



देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचं मोठं आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभं राहिलं आहे. मे महिन्यातील घाऊक तसंच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत. 


गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 12.94 टक्क्यांवर झेपावला आहे. निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे. गेल्या वर्षी मेमध्ये तो उणे 3.37 टक्के होता. तर एप्रिल 2021 मध्ये  10.49 टक्के नोंदला गेला होता. यंदा सलग पाचव्या महिन्यात त्यात वाढ झाली. जूनमधील महागाई दर विक्रमी नसला तरी 12 टक्क्यांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.