नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ४८,९१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,३६,८६१ इतकी झाली आहे. यापैकी ४,५६,०७१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ८,४९,४३१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, आतापर्यंत देशातील ३१,३५८ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राज्यातील लॉकडाऊन उठवू, पण तुम्ही 'या' गोष्टीसाठी तयार आहात का?'

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९,६१५ नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३,५७,११७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने ICMR मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्यास रुग्णांचे प्रमाण काही दिवस वाढेल. पण नंतर दिल्लीप्रमाणे हळुहळू रुग्णांची संख्या कमीदेखील होईल. तसेच मृत्यूदरही कमी होईल, असे ICMR चे म्हणणे आहे.  १ ते २२ जुलै या कालावधीत मुंबईत १,२२,७५९ कोरोना चाचण्या झाल्या. तर दिल्लीत याच काळात ३,१९,५५९ कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.



मुंबईत कोरोना टेस्टची संख्या वाढवा; ICMR चे निर्देश


महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तामिळनाडूतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,९९,७४९ इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत आतापर्यंत १,२८,३८९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.