Richest Indians List : पोर्ट, एअरपोर्टपासून सीमेंट, ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारे अरबपती उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकलं आहे. गेला बराच काळ मुकेश अंबानी हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. 2023 वर्षात हिंडनबर्ग रिचर्स रिपोर्टमुळे गौतम अदानी यांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे नंबर वन स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अदानी यांना एक वर्ष वाट पाहावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या अहवालात 31 जुलै 2024 च्या डेटानुसार गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती 11.6 लाख कोटी रुपये पार झाली आहे. 


प्रत्येक पाच दिवसात एक अरबपती
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या अहवालानुसार 31 जुलै 2024 पर्यंत भारतात प्रत्येक पाच दिवसात एक व्यक्ती अरबपती बनला आहे. आशियातील संपत्ती निर्मितीच्या बाबतीत भारत वेगाने पुढे येत आहे. तर चीनमध्ये यात घसरण झाल्याचं पाहायला मिळालंय. भारतात 2024 या वर्षात संपती निर्मितीत 29 टक्क्यांनी वाढ झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. देशात अरबपतींची संख्या आता 334 इतकी झाली आहे. 


श्रीमंत उद्योगपतींची यादी
भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. त्यांची संपत्ती 10.14 लाख कोटी इतकी आहे. एचसीएल टेक्नलॉजीसचे फाऊंडर शिव नाडर 3.14 लाख कोटीं रुपयांच्या संपत्तीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लस निर्मिती करणारी कंपनी सीमर इन्स्टीट्यूटचे मालक एस. पूनावाला या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर सन फॉर्मास्युटिकल्सचे मालक दिलीप सांघवी पाचव्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षात सहा उद्योगपती असे आहेत जे भारताच्या टॉप-10 अरबपतींमध्ये कायम आहेत. 


या यादीत कुमार मंगलम बिर्ला सहाव्या क्रमांकावर, गोपीचंद हिंदुजा सातव्या, राधाकृष्ण दमानी आठव्या, अझीम प्रेमजी नवव्या आणि नीरज बजाज दहाव्या क्रमांकावर आहेत.