नवी दिल्ली : भारत लवकरच अमेरिकेसोबत रशियाकडून शस्त्र खरेदीसाठी चर्चा करु शकते. मॉस्कोकडून सैन्याच्या आदान-प्रदानावर अमेरिकेने बंदी टाकली आहे. पण भारत एस-400 मिसाईल खरेदीसाठी रशियासोबत 40,000 कोटीची ही डील करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार भारत मिसाईल खरेदीसाठी ट्रंप प्रशासनाकडे सूट मागू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत रशियासोबत एस- 400 मिसाईल खरेदीसाठी पुढचं पाऊल उचलू शकते. ही माहिती भारत अमेरिकेला देणार आहे. अमेरिकेने क्रिमियावर ताबा आणि 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत दखल दिल्यामुळे सीएएटीएसए कायद्याअंतर्गत रशियावर बंद घातली होती.


सीएएटीएसए कायद्याअंतर्गत डोनाल्ड ट्रंप सरकारने रशियासोबत कोणतेही लष्करी साहित्य खरेदी-विक्रीवर बंदी घातली होती. भारताने देखील रशियाकडून शस्त्र खरेदी करु नये अशी अमेरिकेची भूमिका आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच चर्चा होणार आहे. 6 सप्टेंबरला होणाऱ्या या बैठकीत भारत रशियासोबतच्या व्यवहाराबद्दल अमेरिकेला माहिती देणार आहे.


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक आर पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री जेम्स मेटिस यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे.