भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांना `इतका` कमी पगार; ही दरी भरायला लागतील 134 वर्षं
Global Gender Gap Index : भारतीय पुरुषांच्या तुलनेक महिलांची श्रीमंती कमीच.... ही परिस्थिती सुधारायला किती वर्ष लागतील माहितीये?
Global Gender Gap Index : जागतिक स्तरावर आज अनेक ठिकाणी महिला आणि पुरुष यांना समसमान वागणूक मिळत असून, अशी अनेक ठिकाणं, आणि क्षेत्र आहेत जिथं महिलाही पुरुषांच्या बरोबरीनं त्यांची कौशल्य दाखवताना आणि अपेक्षित काम करताना दिसत आहेत. महिला सबलीकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा पद्धतीनं प्राधान्यस्थानी आला, की महिला वर्गाला अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनंही केलं. असं असलं तरीही भारतात मात्र महिला आणि पुरूष यांच्यामध्ये काही निकषांवर असणारी दरी आजही कायम आहे.
Global Gender Gap Index अर्थात ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सचा अहवाल नुकताच जारी करण्यात आला असून, पुरूष आणि महिलांमध्ये आर्थिक निकषांवरून असणारी असमानता इथं स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. यामध्ये भारतात पुरुषांना 100 तर, महिलांना 40 अशा निर्देशांकाच्या फरकानं आर्थिक सुबत्ता प्राप्त असल्याचं कळत असून, एक मोठी दरी पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्तीचं नाव काय?
ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सच्या या अहवालामध्ये भारत 129 व्या स्थानी असून, त्यासोबत या श्रेणीमध्ये बांगलादेश, सुदान, इराण आणि पाकिस्तानसह मोरोक्कोच्याही नावाचा समावेश आहे. आर्थिक समानतेचं प्रमाण अतिशय कमी असणाऱ्या देशांची ही यादी असून, या सर्व देशांमध्ये महिला आणि पुरुषांमधील आर्थिक समानता 30 टक्क्यांहूनही कमी असल्याची माहिती वृत्ततंस्थेनं प्रसिद्ध केलं आहे.
महिला आणि पुरुषांमध्ये आर्थिक समानता असणाऱ्या देशांची यादी (पहिले 10 देश)
आईसलँड- 93.5 टक्के
फिनलँड- 87.5 टक्के
नॉर्वे- 87.5 टक्के
न्यूझीलंड - 83.5 टक्के
स्वीडन- 81.6 टक्के
निकारागुआ- 81.1 टक्के
जर्मनी- 81 टक्के
नाम्बिया- 80.5 टक्के
आयर्लंड - 80.2 टक्के
स्पेन - 79.7 टक्के
समानता गाठण्यासाठी भारताला लागणार 134 वर्षं
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या माहितीनुसार सध्या जगातील लैंगिक असमानता 68.5 टक्क्यांनी कमी झाली असून, ही असमानता कमी करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. लैंगिक असमानता कमी राहण्याचा दर इथून पुढंही कायम राहिल्यास आर्थिक समानतेचा स्तर गाठण्यासाठी भारताला तब्बल 134 वर्षं म्हणजेच शतकभराहूनही जास्त काळ द्यावा लागणार आहे.