मुंबई : शालेय वर्षांपासून ते अगदी मोठं झाल्यावर एखादा फिरण्याचा बेत आखण्यापर्यंत अनेकदा काही गोष्टी या सातत्यानं आपल्यासोबतच वावरत असतात. देशाचा नकाशा त्यापैकीच एक. सुरुवातीला अभ्यासाच्या निमित्तानं आणि नंतर भटकंतीच्या निमित्तानं हा नकाशा सातत्यानं डोळ्यांसमोर येत राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वाधिक भूखंड असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचंही नाव येतं. भारतीयांच्या मनात देशाचा नकाशा इतका कायमस्वरुपी ठसला आहे की, झोपेतून उठूनही कोणाला नकाशा काढ म्हटलं तरीही ही आकृती ते काढून दाखवतील. 


कारण, ही गोष्ट जणू अंगी भिनलीच आहे. भारताचा नकाशा पाहत असतानाच आजुबाजूच्या काही गोष्टीही नकळतच आपल्या नजरेस पडतात. अंदमान निकोबार बेटं असो किंवा मग श्रीलंका हा देश. (India Srilanka)


सध्या आर्थिक संकटात असणाऱ्या श्रीलंका या देशाला थेट त्यांच्या भूमीत जाऊन पाहिलं नसलं तरीही आपण हा देश नकाशातून कायमच पाहिला आहे. पण, इतर शेजारी राष्ट्र वगळता कायमच श्रीलंकेचाच नकाशा भारतासोबत का बरं असतो? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? 


भारताच्या नकाशासोबत श्रीलंकेचा नकाशाही दाखवण्यामागे हिंदी महासागर महत्त्वाची भूमिका निभावतो. इथं समुद्री सीमांशी असणारे नियम आणि कायदेही (Occean law) तितकेच महत्त्वाचे. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारामुळं हा कायदा लागू करण्यात आला. (India Srilanka Map)


1956 मध्ये संयुक्त राष्ट्र संघांमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती united nations convection of the law of the sea. तिथं ज्या चर्चा झाल्या आणि अहवाल सादर करण्यात आला त्यानंतर 1958 मध्ये एक नवा अहवाल सादर केला गेला. 


समुद्री सीमांबद्दल जगभरातील देशांचं एकमत असावं यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. पुढे 1982 मध्ये विविध संमेलमांमध्ये या कायद्यांना मान्यता मिळाली. 


कायदा काय सांगतो? 
सागरी किनारपट्टी लाभलेल्या देशांच्या किनाऱ्यापासून देशाची सीमा 200 नॉटिकल मैल इतकी असेल. थोडक्यात देशाच्या सीमेपासून 200 नॉटिकल मैल अंतरात असणारं ठिकाण देशानं नकाशात दाखवणं बंधनकारक असेल. 


1 नॉटिकल मैल म्हणजे 1.824 किमी अशी आकडेवारी होते. 200 नॉटिकल मैल म्हणजे 370 किमी इतकं अंतर. परिणामी या अंतरात येणारे सर्व घटक भारतानं दाखवणं बंधनकारक असतं. 


भारताचं दक्षिण टोक असणाऱ्या धनुषकोडी इथून श्रीलंकेचं अंतर 18 नॉटिकल मैल इतकंच आहे. ज्यामुळं श्रीलंकेचा नकाशा कायमच भारतासोबत दिसतो.