जयपूर : राजस्थानच्या पोखरणमधून देशाला अभिमान वाटावा अशी बातमी समोर येते आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या पिनाक या अत्यंत महत्वाच्या लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र प्रणालीची तिसरी चाचणीही यशस्वी झाली आहे. कालच या क्षेपणास्त्राच्या पहिल्या दोनही चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. 



डी. आर. डी. ओ. ने विकसित केलेल्या पिनाकमुळे भारतीय पायदळाची संहारक क्षमता आता वाढली आहे. केवळ ४४ सेकंदात १२ क्षेपणास्त्रे डागणारी पिनाक शस्त्रप्रणाली २० ते ९० किमी च्या पल्ल्यामधील टार्गेट अचूकतेने नष्ट करू शकते. आता लवकरच भारतीय पिनाक, रशियन बनावटीच्या स्मेर्क या संहारक क्षेपणास्त्र प्रणालीची जागा घेण्यासाठी सज्ज झाले आहे.