बालेश्वर: भारताच्या लष्करी ताकदीत आज आणखी वाढ झाली. भारताने मध्य मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी २ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.


२००० किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे क्षेपणास्त्र २००० किलोमीटर पर्यंत मारा करू शकते. संरक्षण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजून ३८ मिनिटांनी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र जमीनीवरून जमीनीवर मारा करते. लॉन्च कॉम्प्लेक्स-४ वरून हे प्रक्षेपण करण्यात आले. 


१७ टन आहे मिसाईलचे वजन


इंटरमीडिएट रेंज बॅलेस्टीक क्षेपणास्त्र (आयआरबीएम) हे पहिल्यांदाच लष्करात सहभागी होत आहे. लष्कराच्या स्ट्रॅटेजीक फोर्सेस कमांड (एसएफसी)ने या क्षेपणास्त्राचे परिक्षण केले. डीआरडीओने त्यासाठी मदत केली. वीस मीटर लांबीच्या या अग्नी २ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे वजन १७ टन आहे. तसेच, आपल्यासोबत एक हजार किलो वजनाचा शस्त्रसाठा सोबत ठेवण्याची आणि २००० किलोमीटर अंतरावर घेऊन जाण्याचीही हे क्षेपणास्त्र क्षमता ठेवते.