खासदार झालेल्या सुधा मूर्ती कोण आहेत? `इन्फोसिस`च्या First Investor म्हणून गुंतवलेले `इतके` रुपये
Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : इंफोसिसच्या को-फाऊंडर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.
Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : देशातली दुसरी मोठी आयटी कंपनी इंफोसिस उभी करण्यात मोलाचं योगदान असलेल्या सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना राज्यसभेचं नामांकन जाहीर करण्यात आलं आहे. इंफोसिसचे (Infosys) को-फाऊंडर एन आर नारायण मूर्ती यांनी इंफोसिस कंपनीची सुरुवात केली. यासाठी सुधा मूर्ती यांनी 10000 रुपये उधार घेतले होते. या पैशावर नारायण मूर्ती यांनी कंपनी उभारली आणि आज जगभरात इंफोसिसने आयटी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. आता सुधा मूर्ती व्यवसाय क्षेत्रातून राजकारणाच्या जगतात प्रवेश करत आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी (Sudha Murthy Rajya Sabha) नामनिर्देशित केलं.
सुधा मूर्ती यांचं योगदान
एन आर नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये आपल्या सहा सहकाऱ्यांसह इंफोसिस कंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी भारतातील टॉप-10 व्हॅल्यूएबल कंपन्यांमध्ये सामिल आहे. टाटा ग्रुपच्या टीसीएसनंतर आयटी क्षेत्रीतील इंफोसिस ही दुसरी मोठी कंपनी आहे. इंफोसिसचा मार्केट कॅप 6,69,920.64 कोटी रुपये आहे आणि अमेरिका, इंग्लंड सह अनेक देशात इंफोसिसचा कारभार आहे. नारायण मूर्ती यांनी आपल्या अनेक मुलाखतीत सुधा मूर्ती यांच्या योगदानाबद्दल सांगितलं आहे.
सुधा मूर्ती यांनी घेतले पैसे उधार
नारायण मूर्ती यांनी आयटी कंपनी सुरु करण्याचा विचार केला. त्यावेळी नारायण मूर्ती पत्नी सुधा मूर्ती यांच्यासोबत एका लहानच्या खोलीत राहात होते. कंपनीचं नाव इंफोसिस (Infosys) ठरवण्यात आलं होतं. पण कंपनी सुरु करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यावेळी नारायण मूर्ती यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुधा मूर्ती यांनी 10000 रुपये उधार घेतले होते. पुण्यातल्या एका अपार्टमेंटमध्ये कंपनीची पहिली सुरुवात झाली. त्यानंतर 1983 मध्ये कंपनीचं मुख्यालय बंगळुरुमध्ये स्थापन करण्यात आलं.
अथम मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कंपनीने अल्पावधीतच मोठी प्रगती केली. 1999 मध्ये इंफोसिस US Stock Market नास्डॅक मध्ये लिस्ट होणारी पहिली भारतीय कंपनी बनली. आज या कंपनीत जवळपास 3 लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात.
पहल्या महिला इंजिनिअर
Sudha Murthy यांचा जन्म कर्नाटकच्या शिगांमध्ये 19 ऑगस्ट 1950 मध्ये धाला. सुधा मूर्ती यांच्या वडिलांचं नाव आर एच कुलकर्णी आणि आईचं नाव विमला कुलकर्णी आहे. सुधा मूर्ती यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 150 विद्यार्थ्यांमध्ये सुधा मूर्ती या एकमेव महिला विद्यार्थिनी होत्या. पदवीनंतर सुधा मुर्ती टाटा मोटर्समध्ये कामाला लागल्या. इथेही त्या पहिल्या महिला इंजिनिअर होत्या. सुधा मूर्ती यांनी आतापर्यंत आठ पुस्तकं लिहिली आहेत.
जावई ब्रिटनचे पंतप्रधान
सुधा आणि नारायण मूर्ती यांना दोन मुलं आहेत. मुलगी अक्षता आणि मुलगी रोहन अशी त्यांची नावं आहेत. अक्षताचं लग्न ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्याबरोबर झालंय.