नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अनेक ठिकाणांना उध्वस्त केले आहे. पुलावामा हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होते. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशातील नागरिक करत होते. त्यानंतर पुलवामा हल्ल्याच्या 12 दिवसानंतर भारतीय हवाईदलाने पाकिस्तानात घुसून कारवाई केली. भारतीय जवानांनी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्य टेरर कॅम्पला उडवलं. भारतीय हवाईदलाच्या या कारवाईची माहिती जगासमोर येतोच पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. पाकिस्तानातील सैन्य आणि सरकार यांना नेमकं काय करावं हेच कळत नव्हतं. पाकिस्तानकडून हल्ल्याचं उत्तर दिलं जाईल अशी धमकी दिली जात आहे. पण भारतीय हवाईदल आणि लष्कर अलर्टवर आहे. त्यातच डीआरडीओच्या २ मिसाईल परीक्षण केल्याची माहिती पुढे आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज एजेंसी एएनआयच्या माहितीनुसार, डीआरडीओने जलद प्रतिक्रिया देणारी आणि शत्रूचं विमान किंवा मिसाईल हवेतच उडवणाऱ्या मिसाईलचं परीक्षण केलं आहे. उडीसाच्या तटजवळ याचं परीक्षण करण्यात आलं. हे परीक्षण यशस्वी ठरलं. त्यामुळे भारताने पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ आली तर संपूर्ण तयारी केल्याचं दिसतं आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने भारताला धमकी दिली आहे. इम्रान खानने पाकिस्तानच्या जनतेला आणि सेनेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान वेळ आल्यावर याचं उत्तर देईल. असं देखील इम्रान खानने म्हटलं आहे.


भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईनंतर त्याचा पडसाद पाकिस्तानच्या संसदेत देखील उमटले. विरोधी पक्षाने इम्रान खानवर टीका केली. शर्म करो असं नारे देखील दिले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशींनी म्हटलं की, भारताने नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानला उत्तर देण्याचा हक्क आहे.


भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये कुरैशींनी म्हटलं की, 'आधी भारताने पाकिस्तानला उकवण्याचा प्रयत्न केला आहे. हे नियंत्रण रेषेचं उल्लंघन आहे. पाकिस्तान आपल्या आत्मरक्षणासाठी याचं उत्तर देईल.'