भारताची रणनिती, पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळणार!
भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांवर भारत ३ धरणं बांधणार आहे.
नवी दिल्ली : भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांवर भारत ३ धरणं बांधणार आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळणार आहे. रोहतकमध्ये तिसऱ्या कृषी शिखर संमेलनामध्ये गडकरींनी ही घोषणा केली आहे.
फाळणीनंतर सतलज, व्यास आणि रावी नदी भारतामध्ये तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या पाकिस्तानला मिळाल्या. हा निर्णय झाला तरी सतलज, व्यास आणि रावी नदीचं पाणी पाकिस्तानला मिळत होतं. आता या नद्यांवर तीन धरणं बांधण्यात येणार आहेत. या धरणांमुळे हरियाणातली पाण्याची समस्या मिटेल. तसंच हे पाणी राजस्थानला वळवण्याचाही सरकारचा विचार असल्याचं गडकरी म्हणाले. पाकिस्तानचं पाणी बंद करण्यासाठी ही धरणं बांधण्यात येणार असल्याचं गडकरींनी सांगितलं.