मुंबई : २०२२ मध्ये भारत जी-२०च्या शिखर परिषदेचं यजमानपद पार पाडणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अर्जेंटीना येथी दोन दिवसीय समितीच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली. २०२२ मध्ये भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत असून याच वर्षी भारताकडे जी-२०चं यजमानपद आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी-२०मध्ये जगातील महत्त्वाच्या २० आर्थिक देशांचा समावेश असतो. सुरुवातीला इटली टी-२० शिखर परिषदेचं आयोजन करणार होतं. मात्र आता हे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत माहिती दिली. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी युरोपच्या परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क, युरोप आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर आणि जर्मन चान्सेलर एंजेला मार्केल यांची भेट घेतली. याचवेळी मोदींनी दहशतादाशी लढा देण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी एकत्र येत प्रयत्न करण्यासोबतच भारत- युरोपातीस संबंध आणखी दृढ करण्याविषयी चर्चा केली.